मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत स्वच्छता
महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

मुंबई : गांधी-शास्त्री जयंती आणि 'सेवा संकल्प अभियान'च्या निमित्ताने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसराची स्वच्छता केली.
प्रत्येक शाखा व कक्षात फायलींची शिस्तबद्ध मांडणी, नस्तीकरण आणि कक्ष स्वच्छतेची विशेष मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता ही एका दिवसाची मोहीम नसून दैनंदिन कार्यसंस्कृतीचा भाग असली पाहिजे, असा संदेश यातून देण्यात आला.
