महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली दुष्काळी स्थितीची पाहणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेकटा मंडळात पिकांच्या अवस्थेची पाहणी करून तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा मंडळात पिकांच्या अवस्थेची पाहणी केली. आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकटेश राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गाढे जळगाव येथील शेतकरी उस्मान खान पठाण यांच्या शेतातील सोयाबीन पाण्याअभावी पूर्ण करपून गेले आहे. शासनाने तत्काळ पंचनाम्यांचे आदेश दिले असून अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर अधिक मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
