आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक : मंत्री पंकजा मुंडे

    शासनाचा एकही रुपया खर्च न करता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने राज्यात १३ ठिकाणी 'महा आर-पेट' प्लास्टिक पुनर्प्रक्रिया अभियान सुरू होत असल्याचे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

    ३ ऑक्टोबर २०२६

    ठाणे : प्लास्टिकचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्लास्टिक पुनर्प्रक्रियेचे काम सुरू होत आहे. राज्यात १३ ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या 'महा आर-पेट' अभियानाची सुरुवात ठाण्यातून होत असून असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल, असे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

    हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस, महाराष्ट्र शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. 'एक बॉटल पर्यावरण के नाम' म्हणत प्रत्येकाने अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.