आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    आचारसंहितेत नगरसेवकाच्या निधीतून चक्क दीड कोटींच्या निविदा

    पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू असतानाही ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाने नगरसेवकांच्या 'स' यादीतील कामांसाठी सुमारे १ कोटी ४० लाखांच्या १७ निविदा काढल्या आहेत.

    ३ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील अनेक कामे ठप्प असताना ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाने नगरसेवकांच्या 'स' यादीतील कामे अत्यावश्यक दाखवून निविदा काढल्या आहेत. पुणे स्टेशन, जय जवाननगर परिसरातील चेंबर, पादचारी मार्ग आणि सांडपाणी वाहिनी दुरुस्तीच्या कामांसाठी एकूण १ कोटी ४० लाख ९५ हजार ८९१ रुपयांच्या १७ निविदा आहेत.

    उपायुक्त आशा राऊत यांनी प्रभाग क्रमांक १३ ड मधील ही अत्यावश्यक देखभाल-दुरुस्तीची कामे असून निवडणूक शाखेकडे विचारणा करूनच निविदा काढल्याचे सांगितले.

    मात्र निवडणूक शाखेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी, ही कामे 'स' यादीतील असल्याने आचारसंहितेत न करता नंतर करणे योग्य ठरले असते आणि मुख्य खात्याच्या निधीतूनही ती होऊ शकतात, असे मत व्यक्त केले.