आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    'जलसेवा संकल्प अभियानातून' जलसाक्षरता व पाणी संवर्धनाला चालना

    जलसंपदा विभागातर्फे राज्यात २ ते १७ ऑक्टोबर दरम्यान 'जलसेवा संकल्प अभियान' राबवले जात असून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ येथे त्याचा शुभारंभ झाला.

    ३ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पाण्याचे संवर्धन, योग्य नियोजन आणि कार्यक्षम वापराबाबत नागरिक, शेतकरी व विविध घटकांमध्ये जनजागृतीसाठी राज्यात २ ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान 'जलसेवा संकल्प अभियान' राबवले जात आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ येथे कार्यकारी संचालक संजीव चोपडे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला.

    अभियानात पाणी वापर संस्था, लाभार्थी शेतकरी, प्रकल्पग्रस्त नागरिकांशी संवाद साधला जाणार असून पीक नियोजन, पाणी बचत आणि कार्यक्षम सिंचनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये जलसाक्षरता वाढवण्यासाठीही उपक्रम होणार आहेत.