गांधींचा सत्याग्रह विश्वमानवतेसाठी - डॉ. उल्हासदादा पवार
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे झालेल्या 'स्मरण महामानवांचे' कार्यक्रमात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. उल्हासदादा पवार यांनी गांधीजींचा सत्याग्रह विश्वमानवतेसाठी होता, असे विचार मांडले.

पुणे : संपूर्ण जग युद्धाच्या छायेत असताना गांधी जयंती जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरी होते, हे भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे, असे डॉ. उल्हासदादा पवार म्हणाले. गांधी आणि शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्वर मंडपात हा कार्यक्रम झाला.
अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. सत्य, अहिंसा आणि शांती हेच मानवी जीवनाचे खरे तत्त्व असून आजच्या युद्धजन्य स्थितीत गांधीजींच्या विचारांची गरज आहे, असे ते म्हणाले.
