आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    चाकण-हिंजवडी परिसरातील कामाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आढावा

    चाकण आणि हिंजवडी औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, खड्डे, नाल्यांवरील अतिक्रमणे आणि सार्वजनिक वाहतुकीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी टास्क फोर्स समितीमार्फत आढावा घेतला.

    ३ ऑक्टोबर २०२६

    पुणे : चाकण आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पर्जन्य जलनिस्सारण, नाल्यांवरील अतिक्रमणे, रस्ते रुंदीकरण, जंक्शन व यु-टर्नचे नियोजन आणि सार्वजनिक वाहतुकीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उच्चस्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत आढावा घेतला.

    नाल्यांवरील हंगामी अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी आणि केवळ खड्डे बुजवण्याऐवजी प्रभावी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज उभारावे, अशा सूचना देण्यात आल्या. महामार्गावर अनधिकृत बस थांबे व पार्किंगविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, असेही निर्देश दिले.

    गणेशोत्सवामुळे थांबलेली अतिक्रमणविरोधी कारवाई तातडीने पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.