विधान परिषद पदवीधर निवडणुकीत असे करा मतदान
विधान परिषद निवडणुकीत मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदान करायचे असल्याने मतदारांनी योग्य पद्धत जाणून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
पुणे : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवून मतदान होते. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेले जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरावे; अन्य पेन किंवा पेन्सिल वापरल्यास मतपत्रिका अवैध ठरेल.
पहिल्या पसंतीच्या उमेदवारासमोर '१' हा आकडा फक्त एकाच उमेदवारासमोर लिहावा. पुढील पसंती २, ३, ४ अशा आकड्यांत द्यावी; शब्दांत लिहू नये. पहिली पसंती देणे आवश्यक असून इतर पसंती ऐच्छिक आहेत.
मतपत्रिकेवर नाव, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा किंवा बरोबरची खूण केल्यास ती बाद ठरेल.
