घोडेगाव येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव आणि सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.

घोडेगाव : सेवा संकल्प अभियानांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव यांच्या वतीने इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळेत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा झाला. प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांच्यासह अधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ज्येष्ठांचा अनुभव ही समाजाची अमूल्य शिदोरी असून त्याचा सन्मान करणे ही पुढील पिढीची जबाबदारी आहे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
