आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    दुचाकी चोरून भंगारात स्पेअर पार्ट विकणारी टोळी गजाआड, पाच दुचाकींसह २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

    दुचाकी चोरून त्यांचे सुटे भाग भंगारात विकणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघांना अटक करून पाच दुचाकींसह २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

    ३ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : दुचाकी चोरून त्यांचे सुटे भाग वेगळे करून भंगारात विकणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला. पवन मरीआप्पा भज्जी (वय २५, रा. औंध) आणि ऋषीकेश शहाजी साठे (वय २९, रा. पिंपळे निलख) यांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले.

    बाणेरमधील एका सोसायटीतून यामाहा एमटी १५ दुचाकी चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी ९० ते १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. पिंपळे निलख येथील फॅब्रिकेशनच्या दुकानाच्या झडतीत चोरीच्या दुचाकींचे पार्ट्स वेगळे करण्याचे काम सुरू असल्याचे आढळले. पाच दुचाकी आणि सुटे भाग जप्त करण्यात आले.

    आरोपींवर यापूर्वीही वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.