आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा : पिंपरी-चिंचवडकर नोंदवणार नवा विश्वविक्रम..!

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 'स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण' आणि १२८ मीटर उंच धर्मध्वजाला मानवंदना देण्यासाठी रविवारी (४ ऑक्टोबर) मोशी येथे पाच हजारांहून अधिक ढोलवादक नवा विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

    ३ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : महाराष्ट्रभरातील ढोल-ताशा पथकांच्या साथीने रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात मानवंदना सोहळा होणार आहे. पाच हजारांहून अधिक ढोलवादकांची नोंदणी पूर्ण झाली असून सर्वांना प्रवेश मोफत आहे.

    १११ शंखांचा सामूहिक शंखनाद, 'शिवशंभो गर्जना' हा शिवभक्तीपर कार्यक्रम, शाहीर चंद्रकांत माने व शाहीर खुपिरे यांचे सादरीकरण आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके होणार आहेत. नशामुक्त भारतासाठी सामूहिक प्रतिज्ञा आणि संपूर्ण 'वंदे मातरम'चे गायनही होईल.

    हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट आणि ढोल-ताशा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा होत असून विक्रमाची अधिकृत पुष्टी कार्यक्रमानंतर होईल, असे आयोजकांनी सांगितले.