नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : विधान परिषद उपसभापती सचिन अहिर
अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी नांदगाव खंडेश्वर येथे पाहणीनंतर सांगितले.

अमरावती : नांदगाव खंडेश्वर परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले असून तातडीने पंचनामे करून मदत दिली जाईल, असे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले. त्यांनी सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
बॅकवॉटरमुळे होणाऱ्या सततच्या नुकसानीचा प्रश्न सोडवण्यासाठी पाटबंधारे विभाग आणि शेतकऱ्यांची बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना दिल्या. डिसेंबरमध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान याबाबत बैठक घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. सालोड येथील पीडित शेतकरी कुटुंबांचीही त्यांनी भेट घेतली.
