आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच 'फायरवॉल' : मंत्री अॅड. आशिष शेलार

    डीएससीआयच्या सायबर सुरक्षा जनजागृती महिन्यांतर्गत 'बी सायबर स्ट्रीट स्मार्ट' मोहिमेचा शुभारंभ करताना जनजागृती हीच सायबर गुन्ह्यांविरुद्धची खरी 'फायरवॉल' असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.

    ३ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांचा ऑनलाइन वावर वाढत असताना सायबर गुन्ह्यांचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे डिजिटल जनजागृती अधिक महत्त्वाची असून जनजागृती हीच प्रभावी 'फायरवॉल' ठरू शकते, असे मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) 'बी सायबर स्ट्रीट स्मार्ट' मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी सांगितले.

    महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेत दैनंदिन सायबर सुरक्षेच्या सवयी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने होणारी फसवणूक आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांना जागरूक केले जाईल. निवृत्तीवेतनधारक, गुंतवणूकदार, विद्यार्थी अशा प्रत्येकाने ऑनलाइन सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले.