जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गांधीजींचे सत्य, अहिंसा व स्वच्छतेचे विचार आणि शास्त्रीजींच्या साधेपणा व राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करण्यात आले.
