जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! ९२ कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
जळगाव जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्या ९२ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
जळगाव : जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेतून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. बनावट तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या घोटाळ्यामुळे तब्बल ९२ कर्मचाऱ्यांची नोकरी आता धोक्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्हा परिषदेत एकूण ७१३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार जिल्हा परिषदेत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराकडे किमान ४० टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. मात्र, शासनाच्या नव्या आदेशानुसार जेव्हा सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा सखोल पडताळणी सुरू झाली, तेव्हा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
