आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी एमसीएमसी समिती कार्यान्वित

    पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी एमसीएमसी समिती कार्यान्वित करण्यात आली आहे.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक- २०१६ च्या अनुषंगाने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातीळ प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली असून निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे बल्क एसएमएस, रेकॉर्डेड व्हॉईस मेसेजेस, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील तसेच सर्व प्रकारच्या डिजिटल मीडिया जाहिराती यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.

    निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर होत असतो. एमसीएमसी समितीमार्फत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासोबतच राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात येते.