अब नॉर्मल होम ची मुलं घेतायेत स्वावलंबनाचे धडे : संदीप खर्डेकर
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी 'अब नॉर्मल होम' या विशेष मुलांच्या संस्थेला भेट देऊन तेथील मुलांच्या स्वावलंबन उपक्रमांचे कौतुक केले.

पुणे : पुणे : किशोरताई पाठक संचालित अब नॉर्मल होम ला भेट देताना मनस्वी समाधान लाभते कारण येथे विशेष मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले जातात असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. ह्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहताना बघून आनंद वाटतो आणि म्हणूनच दिवाळी साठी ह्या मुलांनी बनविलेल्या वस्तू खरेदी कराव्यात असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
आमच्या कडे विशेष मुलांना विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते व त्याच बरोबर त्यांना व्यवहार ज्ञान ही शिकविले जाते जेणेकरून ही मुलं स्वावलंबी होतील असे अब नॉर्मल होम च्या संचालिका किशोरताई पाठक म्हणाल्या. आम्ही मुलांना रोप तयार करणे, पणत्या रंगविणे, कॉफी पेंटिंग करणे यासह विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देतो व त्यांची विक्री ही करतो असेही त्या म्हणाल्या.
