आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    अब नॉर्मल होम ची मुलं घेतायेत स्वावलंबनाचे धडे : संदीप खर्डेकर

    किशोरीताई पाठक संचालित अब नॉर्मल होममधील विशेष मुलांना स्वावलंबनाचे प्रशिक्षण दिले जात असून नागरिकांनी दिवाळीसाठी त्यांनी बनवलेल्या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन संदीप खर्डेकर यांनी केले.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : किशोरीताई पाठक संचालित अब नॉर्मल होमला भेट देताना मनस्वी समाधान लाभते, कारण येथे विशेष मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले जातात, असे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. नागरिकांनी दिवाळीसाठी या मुलांनी बनवलेल्या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

    क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे मुलांना कलरिंग किट, ब्रश, पोस्टर कलर आणि इतर साहित्य भेट देण्यात आले. मुलांनी बनवलेले साहित्य गांधी भवन कोथरूड येथील अंधशाळेशेजारी खरेदी करता येईल.