निःस्पृह पत्रकार व निगर्वी व्यक्तिमत्व रामभाऊ जोशी : डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे विचार
अनिल जोशी लिखित 'रामभाऊ जोशी - जीवन प्रवास व चरित्रग्रंथ'चे प्रकाशन एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते झाले.

पुणे : पत्रकारितेतील प्रदीर्घ पर्व म्हणजे रामभाऊ जोशी. सात दशकांचा त्यांचा काळ आदर्श, अभ्यासू आणि निकोप होता, असे विचार माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
अनिल जोशी लिखित चरित्रग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. उल्हासदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
