जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! ९२ कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवल्याचा प्रकार उघड झाल्याने जळगाव जिल्हा परिषदेतील ९२ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेत बनावट तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. या घोटाळ्यामुळे तब्बल ९२ कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे.
जिल्हा परिषदेत एकूण ७१३ अधिकारी व कर्मचारी दिव्यांग प्रवर्गातून कार्यरत आहेत. नियमानुसार किमान ४० टक्के दिव्यांगत्व आवश्यक असते; शासनाच्या नव्या आदेशानुसार सर्वांच्या प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी सुरू झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
