आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी एमसीएमसी समिती कार्यान्वित

    पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित झाली आहे.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ च्या अनुषंगाने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एमसीएमसी समिती कार्यान्वित करण्यात आली आहे.

    बल्क एसएमएस, रेकॉर्डेड व्हॉइस मेसेज, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडिया आणि इंटरनेटवरील सर्व प्रकारच्या प्रचार जाहिराती समितीकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. प्रमाणित करावयाच्या जाहिरातीचा मजकूर प्रसारणाच्या ३ दिवस आधी सादर करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.