कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन परिस्थितीचा संयुक्त सराव यशस्वी
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत अमोनिया वायू गळतीची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून विविध यंत्रणांचा संयुक्त आपत्कालीन सराव यशस्वीपणे पार पडला.

कुरकुंभ : औद्योगिक आपत्कालीन परिस्थितीत आस्थापना, शासकीय यंत्रणा, पोलीस, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वय तपासण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत संयुक्त सराव घेण्यात आला. अमोनिया वाहतूक करणाऱ्या टँकरमधून वायुगळती होऊन गुडलक चौक परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे काल्पनिक दृश्य तयार करण्यात आले.
बचावकार्य, प्रथमोपचार, अग्निशमन, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. सहभागी पथके निर्धारित वेळेत घटनास्थळी पोहोचली.
