पुणे विभाग पदवीधर मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ओम प्रकाश बकोरिया तर शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. हनमनलू तुम्मोड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
पुणे : भारत निवडणूक आयोगाने पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ओम प्रकाश बकोरिया (भाप्रसे) यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते बंडगार्डन येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत भेटतील.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. हनमनलू तुम्मोड यांची नियुक्ती झाली असून ते सर्किट हाऊसमध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भेटतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिली.
