तलविंदरने 'अस्सेपास्से'मधून मांडल्या मनातील भावना
गायक तलविंदरने आपल्या आगामी ईपी 'पेंटेड फीलिंग्ज'ची पहिली झलक 'अस्सेपास्से' या गाण्याच्या रूपात प्रसिद्ध केली आहे.
पुणे : तलविंदरने बहुप्रतीक्षित 'पेंटेड फीलिंग्ज' या ईपीची पहिली झलक 'अस्सेपास्से' या गाण्याच्या रूपात प्रसिद्ध केली. पंजाबीमध्ये 'अस्सेपास्से' म्हणजे आजूबाजूचा परिसर; आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला कसे घडवतात, हा विचार गाण्यातून मांडला आहे.
