आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

    पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी, शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पात्र मतदारांसाठी भरपगारी सुट्टी किंवा विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून मतदानाच्या दिवशी, शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम १३५ ब नुसार भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही रजा मतदारांच्या अनुज्ञेय नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

    ही विशेष रजा खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना लागू होणार नाही. मात्र खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत द्यावी, असे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.