आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

    सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेच्या तयारीसाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात १९ ते २८ ऑक्टोबर दरम्यान मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून इच्छुकांनी १६ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरतीसाठी आवश्यक एसएसबी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षण १९ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होईल.

    पुणे जिल्ह्यातील इच्छुकांनी १६ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. सीडीएस किंवा एनडीए परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत.