आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

    भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांना नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी पात्र उमेदवारांना नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकारी पदाची संधी मिळविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे १६ ऑक्टोबर २०१६ पर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत यांनी केले आहे.

    हा प्रशिक्षण अभ्यासक्रम १९ ते २८ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ठरलेले उमेदवार पात्र आहेत. तसेच एनसीसी विशेष प्रवेशासाठी एसएसबी मुलाखतीचे बोलावणे पत्र, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीचे बोलावणे पत्र असलेले उमेदवार तसेच विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबीचे बोलावणे पत्र किंवा एनसीसी एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असलेले उमेदवारही पात्र आहेत.