आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

    पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांवरील विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेत कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतला. राजमाता सईबाई स्मृतिस्थळासाठी भूसंपादन आणि संत जगनाडे महाराज स्मारकाच्या कामांची स्थिती तपासण्यात आली.

    सिंहगड आणि राजगड किल्ल्यांवरील पर्यटनविषयक सुविधांचाही आढावा घेण्यात आला. कामांची गुणवत्ता आणि कालमर्यादा याबाबत यंत्रणांनी नियमितपणे आढावा घेऊन दिरंगाई टाळावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.