आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    सेवा संकल्प अभियानांतर्गत 'आशीर्वादाचा दिवा' उपक्रम

    सेवा संकल्प अभियानांतर्गत समाजकल्याण विभागाच्या वतीने विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात 'आशीर्वादाचा दिवा' उपक्रम आयोजित करण्यात आला.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत समाजकल्याण विभागाच्या वतीने 'आशीर्वादाचा दिवा' हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, युनिट क्र. १, विश्रांतवाडी येथे सन २०२३ ते २०२६ या कालावधीत एलएल.बी.चे शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी वैभव डोईजड यांची केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) या गुप्तचर विभागात उच्च पदावर नियुक्ती बद्दल व त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल समाजकल्याण विभागाच्या वतीने शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुख श्रीमती विजयश्री बाबर यांच्या हस्ते वैभव डोईजड यांचा सत्कार करण्यात आला.

    या प्रसंगी वैभव डोईजड यांनी विद्यार्थ्यांसमोर आपली यशोगाथा आणि शैक्षणिक प्रवासातील अनुभव मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय निश्चित करणे, सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करण्याचा प्रेरणादायी संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.