सेवा संकल्प अभियानांतर्गत 'आशीर्वादाचा दिवा' उपक्रम
समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहातून शिक्षण घेऊन आयबीमध्ये उच्च पदावर नियुक्त झालेले माजी विद्यार्थी वैभव डोईजड यांचा 'आशीर्वादाचा दिवा' उपक्रमात सत्कार करण्यात आला.

पुणे : सेवा संकल्प अभियानांतर्गत समाजकल्याण विभागाने 'आशीर्वादाचा दिवा' हा उपक्रम आयोजित केला. विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात २०२३ ते २०२६ या काळात एलएल.बी.चे शिक्षण घेतलेले वैभव डोईजड यांची केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये उच्च पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
डोईजड यांनी विद्यार्थ्यांसमोर आपला शैक्षणिक प्रवास मांडला आणि ध्येय, सातत्य व परिश्रमाचा संदेश दिला.
