एअरटेल बिझनेसने आयक्यू गेटवे लॉन्च केले - सुरक्षित एंटरप्राइज मेसेजिंगसाठी टेलको-ग्रेड नेटवर्क इंटेलिजन्ससह भारताचे पहिले बिझनेस कम्युनिकेशन्स प्लॅटफॉर्म
एअरटेल बिझनेसने एसएमएस, व्हॉट्सॲप, आरसीएस आणि व्हॉइस संवाद एकाच सुरक्षित प्लॅटफॉर्मवरून व्यवस्थापित करणारा 'एअरटेल आयक्यू गेटवे' लॉन्च केला आहे.
पुणे : एअरटेल बिझनेसने 'एअरटेल आयक्यू गेटवे' लॉन्च केला असून हे भारतातील पहिले टेलको-ग्रेड नेटवर्क इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म असल्याचा कंपनीचा दावा आहे. एसएमएस, व्हॉट्सॲप, आरसीएस आणि व्हॉइस संवाद एकाच कंट्रोल प्लेनवरून व्यवस्थापित करता येतील.
फसवणूक प्रतिबंधक सुविधांमुळे बँका, वित्तीय संस्था आणि उद्योगांना ग्राहकांचा विश्वास राखण्यास मदत होईल, असे एअरटेल बिझनेसचे सीईओ शरत सिन्हा यांनी सांगितले.
