आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्सने ब्रँडची नवीन ओळख सादर केली
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनीने आपली नवीन ब्रँड ओळख आणि 'हर कल आसान' ही नवीन टॅगलाईन जाहीर केली आहे.
पुणे : पुणे : "आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्स लिमिटेड"ने आज आपली नवीन ब्रँड ओळख आणि टॅगलाईन - 'हर कल आसान' जाहीर केली.
या नवीन ब्रँड ओळख आणि टॅगलाईनबद्दल आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्स लिमिटेडचे मार्केटिंग, डिजिटल आणि बँकाश्युरन्स विभागाचे प्रमुख श्री. श्रीनिवास बालसुब्रह्मण्यन म्हणाले, लाखो भारतीयांच्या जीवनात विश्वासाचे, सामर्थ्याचे आणि आर्थिक सेवांच्या सुलभ उपलब्धतेचे प्रतीक म्हणून आयसीआयसीआय हे नाव एक अढळ स्थान राखून आहे. गेल्या २५ वर्षांत, २० कोटींहून अधिक भारतीयांची स्वप्ने आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करण्याचा बहुमान आम्हाला मिळाला आहे. या प्रवासात आम्ही भारताची अभूतपूर्व प्रगती आणि त्याचबरोबर येथील लोकांच्या आकांक्षांमध्ये झालेला महत्त्वपूर्ण बदल अनुभवला आहे.
