आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

    पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतला.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध कामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतला. संबंधित विकासकामांची सद्य:स्थिती, प्रगती, आवश्यक प्रशासकीय कार्यवाही आणि निश्चित कालमर्यादा याबाबत संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात आली.

    राजमाता सईबाई स्मृतीस्थळासाठी आवश्यक भूसंपादन आणि खरेदीखत प्रक्रियेबाबत कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच राजमाता सईबाई स्मृतीस्थळ आणि संत जगनाडे महाराज स्मारकाच्या कामांची सद्य:स्थिती तपासून निर्धारित कालमर्यादेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सिंहगड आणि राजगड किल्ल्यांवरील पर्यटनविषयक सुविधांचाही आढावा घेण्यात आला. पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, सुरू असलेली विकासकामे तसेच संबंधित प्रशासकीय बाबींची माहिती घेण्यात आली. ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक विकासकामे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.