आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिंपरी-चिंचवडमध्ये ७ ऑक्टोबरपासून भव्य राष्ट्रीय पुस्तक मेळा; ५० हून अधिक प्रकाशकांचा सहभाग, हजारो पुस्तकांची मेजवानी

    निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान भव्य राष्ट्रीय पुस्तक मेळा होणार असून ५० हून अधिक प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध असतील.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : भारतीय विचार साधना फाउंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच भव्य राष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवार (७ ऑक्टोबर) ते शनिवार (१० ऑक्टोबर) या कालावधीत निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ येथे हा मेळा भरणार आहे.

    मेळ्याचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. इतिहास, संस्कृती, विज्ञान, शेती, आरोग्य, बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध असतील. वेळ : ८ ते १० ऑक्टोबर, सकाळी ९.३० ते रात्री ८.३०.