आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    महापालिकेचे कामकाज ठप्प! निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांना लागला ब्रेक

    पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विकासकामांना ब्रेक लागला आहे.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांना मोठा ब्रेक लागला आहे. नवीन विकासकामांना मंजुरी देण्यासह निविदा प्रक्रिया राबविण्यावर निर्बंध आल्याने महापालिकेतील अनेक प्रस्ताव रखडले आहेत. स्थायी समितीच्या बैठका आणि धोरणात्मक निर्णयांनाही मर्यादा आल्याने महापालिकेचे नियमित कामकाज ठप्प झाले आहे.

    आचारसंहितेमुळे नवीन विकासकामे सुरू करणे, त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पुढे नेणे तसेच निविदा काढण्याच्या प्रक्रियेलाही फटका बसला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या मात्र अंतिम मंजुरी किंवा पुढील कार्यवाहीच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांनाही त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक तसेच विविध पायाभूत सुविधांशी संबंधित कामांना विलंब होण्याची शक्यता आहे.