आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    रिक्षाची भाडेवाढ आली अंगलट! कारचा प्रवास पडतोय स्वस्त; पवरील 'या' गणिताने चालक चक्रावले

    आरटीओने १ सप्टेंबरपासून रिक्षाच्या मीटर दरात वाढ केल्यानंतर अनेक मार्गांवर ॲपवरील कारचे भाडे रिक्षापेक्षा ५० ते १०० रुपयांनी कमी दिसत असल्याने प्रवासी कारकडे वळत आहेत.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : रिक्षाच्या मीटर दरात झालेल्या भाडेवाढीनंतर ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या ॲपवर रिक्षाचे भाडे वाढले, मात्र कारच्या भाड्यात फारशी वाढ झाली नाही. त्यामुळे अनेक मार्गांवर कारचे भाडे रिक्षापेक्षा ५० ते १०० रुपयांनी कमी दिसत आहे आणि प्रवासी आरामदायी, वातानुकूलित कारला पसंती देत आहेत.

    चिंचवडगाव ते पुणे स्टेशन मार्गासाठी रिक्षाचे भाडे ३६८ रुपये, तर कारचे भाडे २९४ रुपये आहे. चिंचवडगाव ते कात्रज मार्गावर ही बचत ९१ रुपयांपर्यंत आहे.

    ॲपवरील भाडे आणि मीटर भाडे यांतील फरकामुळे प्रवासी-चालकांमध्ये वाद होत आहेत. काही चालकांकडून 'ऑटो क्लिकर'सारख्या सॉफ्टवेअरचा वापर होत असल्याचा आरोप असल्याने प्रामाणिक चालक भरडले जात आहेत.