आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बोनस, ग्रॅज्युटी, विमा, समान काम समान वेतनासह विविध मागण्यांसाठी कामगार मेळाव्यात कामगार नेते यशवंतभाऊ भोसले आक्रमक; अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक

    कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पिंपरी येथे आयोजित कामगार मेळाव्यात कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी : कंत्राटी, कायम व हंगामी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती कामगारनेते तथा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे येथे (दि.४) जगद्गुरु संत तुकाराम महाराज येथील सभा मंडपात भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला था. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात कंत्राटी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

    यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, सन २०१५-१६ चा बोनस कायद्यानुसार दिवाळीपूर्वी देऊन सेवानिवृत्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व बोनस देण्यात यावा. तसेच सफाई कर्मचारी व नर्सेस यांना पाच लाख रुपयांपर्यंतची विमा पॉलिसी देऊन त्यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनाही लाभ मिळावा. स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित केलेल्या किमान वेतन दराप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन न देणाऱ्या व त्यांच्या वेतनाचे शोषण करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून कर्मचाऱ्यांना कायदेशीर वेतन देण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत.