आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बोनस, ग्रॅच्युटी, विमा, समान काम समान वेतनासह विविध मागण्यांसाठी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले आक्रमक; अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक

    कंत्राटी, कायम व हंगामी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडी शासनाकडे पाठपुरावा करणार असून अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक होणार आहे.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे (दि. ४) झालेल्या कामगार मेळाव्यात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या. २०२५-२६ चा बोनस दिवाळीपूर्वी द्यावा, सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी व बोनस द्यावा आणि सफाई कर्मचारी व नर्सेसना पाच लाखांपर्यंत विमा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

    प्रधानमंत्री आवास योजनेतून ४५० चौरस फुटांचे घर, वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी आणि समान काम समान वेतन देण्याची मागणीही करण्यात आली. अपर कामगार आयुक्त अभय गीते यांनी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.