आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

    राज्य सरकारचा लेखी अध्यादेश मिळेपर्यंत पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाणार नाही, असे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : येत्या १५ ऑक्टोबरपासून पाणीकपात करण्याचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जाहीर केला. हा निर्णय सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू राहणार असल्याने पुणे महापालिकेलाही तो घ्यावा लागणार आहे. मात्र राज्याकडून लेखी अध्यादेश प्राप्त होत नाही तोपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

    पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांतील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सध्या धरणात एक टीएमसी पाणी कमी असले तरी आतापासूनच नियोजन केल्यास हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल.

    आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास उन्हाळ्यात पुणेकरांना पुरेसे पाणी देणे शक्य होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. महापौर आणि आयुक्त दौऱ्यावरून परतल्यानंतर लेखी अध्यादेश आल्यावर एका आठवड्यात निर्णय घेतला जाईल.