पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर
पुणे शहरात १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात लागू होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे : पुणे : जोपर्यंत राज्याकडून लेखी अध्यादेश महापालिकेकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत पाणीकपातीबाबत निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्टीकरण महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिले आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून पाणीकपात करण्याचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जाहीर केला आहे. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वांनाच लागू राहणार आहे.
त्यामुळे पुणे महापालिकेलादेखील हा निर्णय घ्यावा लागणार आहे. पावसाचे प्रमाण, धरणातील साठा आणि एकूणच राज्यातील पाण्याची स्थिती पाहता आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पुणे आणि परिसराचा विचार केला तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणातील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे.
