आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे 'मेट्रो वर्ष' ठरावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    २०२७ हे 'मेट्रो वर्ष' ठरवून पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत दिले.

    ६ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : २०२७ हे 'मेट्रो वर्ष' ठरवून प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात. डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणाऱ्या ३६ किलोमीटर मार्गिकांची व्याप्ती ५० किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहातील वॉर रूम बैठकीत दिले.

    प्रकल्पांवरील किमान ५० टक्के काम यांत्रिकीकरणावर आधारित असावे, शिवडी ते वरळी उन्नत मार्गिका ३१ मे २०२७ पूर्वी पूर्ण करावी आणि कामे रखडवणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

    छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेत प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.