आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    देश-विदेश

    पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनात २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, जगात कुठेही पद आणि प्रतिष्ठा मिळाली तरी भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही, असे म्हटले आहे.

    ७ ऑक्टोबर २०२६

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनात २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशातील जनतेचे आभार मानले आहेत. ७ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. या प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीत जनतेला संबोधित केले.

    पंतप्रधान म्हणाले की, मला सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण करण्याची संधी मिळाली, हा जनतेचा आशीर्वाद आहे. जगात कुठेही पद, प्रतिष्ठा आणि अधिकार मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी जगात कुठेही मिळणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. हा प्रवास वैयक्तिक नसून देशाच्या सेवेसाठी समर्पित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, देशाने मला खूप काही दिले आहे, त्यामुळे देशाप्रती माझी जबाबदारी मोठी आहे. जनतेने मला लोकसभा आणि विधानसभेत सेवा करण्याची संधी दिली. देशाची निरंतर सेवा करणे हेच माझे ध्येय असून, गरिबांची सेवा करणे हा आमचा धर्म असल्याचे त्यांनी नमूद केले.