आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची टीका

    काँग्रेसने निवडणूक आयोगाविरुद्ध केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असून, काँग्रेस घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला आहे.

    ७ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : काँग्रेसने निवडणूक आयोगाविरुद्ध केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र टीका केली आहे. काँग्रेस पक्ष देशातील घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

    फडणवीस म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन म्हणजे भारताच्या लोकशाही संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. दररोज खोटे बोलून लोकांच्या मनात घटनात्मक संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करणे आणि त्यानंतर संविधानाचा त्याग करणे, हा काँग्रेसचा कट आहे.

    विद्यार्थ्यांच्या राजकीय हेतूने वापर करण्याच्या प्रयत्नांना राजकीय पातळीवर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगतानाच त्यांनी विद्यार्थ्यांच्या रास्त समस्यांचे निवारण ठोस कृतीद्वारे केले जात असल्याचे स्पष्ट केले.