आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    प्रचाराच्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे लावण्यास निर्बंध

    पुणे जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार वाहनांवर फलक आणि झेंडे लावण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत.

    ७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे जिल्ह्यात विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार वाहनांवर फलक आणि झेंडे लावण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

    या आदेशानुसार, प्रचार करणाऱ्या फिरत्या वाहनांवर डाव्या बाजूला विंडो स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि वाहनाच्या टपापासून दोन फूट उंचीपेक्षा जास्त असणार नाही अशा पद्धतीनेच कापडी फलक किंवा झेंडा लावता येईल. हे आदेश पुणे जिल्ह्यासाठी ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत लागू राहतील.

    आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम २२३ मधील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे. उमेदवारांनी अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांशिवाय इतर कोणत्याही वाहनावर प्रचार साहित्य लावता येणार नाही.