आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृती

    बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत महिला आरोग्य, अवयवदान आणि रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात आली.

    ७ ऑक्टोबर २०२६

    बारामती : बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत महिला आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, अवयवदान आणि रक्तदानाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली. अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले गेले.

    स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वतीने महिला आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती तसेच समुपदेशन करण्यात आले. या उपक्रमाचा १४० महिलांनी लाभ घेतला. तसेच वैद्यकीय व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अवयवदानाची शपथ घेतली. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात ३६ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

    या उपक्रमाचे नियोजन व देखरेख जन औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आली. या माध्यमातून नियमित रक्तदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले. विविध विभागांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला.