आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अग्रलेख

    बाजारपेठांत चैतन्याचा अभाव

    परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेतल्याने आणि खनिज तेलाचे दर वाढल्याने बाजारपेठांमध्ये मंदीचे वातावरण असून चैतन्याचा अभाव जाणवत आहे, यावर भाष्य करणारा अग्रलेख.

    ७ ऑक्टोबर २०२६

    परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातील समभाग विकून बाहेर जात आहेत. खनिज तेलाचे दर भडकल्यामुळे देशाचा आयातीवरील खर्च वाढला आहे. देशातील जवळपास ४० टक्के लोकांच्या खर्चक्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. यंदाच्या सणासुदीचा काळ गेल्यावर्षी इतका सुखावह नाही, कारण बाजारात सामसूम आहे.

    जगामध्ये अनिश्चिततेचे वातावरण असले, तरीदेखील संरचनात्मक सुधारणा करणे, देशांतर्गत उत्पादनक्षमतेचा विस्तार करणे आणि ज्या क्षेत्रात आयातीवर अवलंबून खूप आहे, त्या क्षेत्रातील देशांतर्गत क्षमता वाढवणे यावर भारताचा भर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांचे मुख्य सचिव शशिकांत दास यांनी केले आहे.

    आता घटस्थापना होत असून, तीव्र दुष्काळामुळे दसरा-दिवाळीआधीच खेड्यापाड्यांतून मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागले आहे. सोयाबीन काढणे आणि कापूस वेचणी ही कामे महत्त्वाची असतात, परंतु ही दोन्ही पिके हातातून गेल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे बाजारातील मागणी घटली आहे.