आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    श्री महालक्ष्मी मंदिरातील 'सार्वजनिक नवरात्रोत्सव' रविवारपासून (दि.११)

    पुणे येथील श्री महालक्ष्मी मंदिरात रविवार, ११ ऑक्टोबर २०१६ पासून सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

    ७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे येथील श्री महालक्ष्मी मंदिरात रविवार, ११ ऑक्टोबर २०१६ पासून सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती, तसेच धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

    यंदा 'शृंगार' हा संकल्प असून घटस्थापनेच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला नवा सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे. हा मुकुट २ किलो वजनाचा असून आकर्षक नक्षीकाम व कलाकुसर करण्यात आली आहे. भाविकांना हा मुकुट पाहण्याची संधी पहिल्या दिवसापासून मिळणार आहे.

    उत्सवाचे प्रमुख विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नवरात्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक विधी, महाआरती, तसेच महिला शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. तसेच १५ ऑक्टोबर रोजी जिवंत देखावा सादर केला जाणार आहे.