आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांचा कार्याचा गौरव; सेवा संकल्प अभियानांतर्गत ६३० विशेष शिक्षकांचा सन्मान

    पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या ६३० विशेष शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

    ७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या ६३० विशेष शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

    दिशा अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात ३७ मनोविकलांग शाळा कार्यरत असून, दिव्यांग विभागांतर्गत अंध प्रवर्गाच्या ८, अस्थिव्यंग प्रवर्गाच्या ५, मूकबधिर प्रवर्गाच्या २० तसेच १ शासकीय शाळा कार्यरत आहेत. या शाळांमधील विशेष शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

    यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहायक आयुक्त सत्यजित बडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते अनिल निंबाळकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती अस्मा बेगम उपस्थित होत्या.