ओबीसी महामंडळामार्फत एकरकमी परतफेड योजना लागू
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड योजना ३१ मार्च २०१७ पर्यंत लागू केली आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड योजना (OTS) लागू केली आहे. या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
या योजनेअंतर्गत संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना ३१ मार्च २०१७ पर्यंत लागू करण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक श्रीमती आर. एन. माने यांनी दिली.
