आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    कोथरूड वाहतूक विभाग अंतर्गत महादेव मंदिर चौकात वाहतूक मार्गात बदल

    कोथरूड येथील महादेव मंदिर चौकातून नदीपात्राकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला असून, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.

    ७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : कोथरूड वाहतूक विभाग अंतर्गत महादेव मंदिर चौकातून नदीपात्राकडे जाणाऱ्या दुतर्फा रस्त्यावर दररोज सायंकाळी ५ ते ८ दरम्यान वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत नदीपात्राकडून महादेव मंदिर चौकात येणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

    वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत. महादेव मंदिर चौकातून डावीकडे वळून पाडळे पॅलेस सर्कल येथून उजवीकडे वळून पुढे शारदा सेंटर मार्गे जावे, किंवा महादेव मंदिर चौकातून उजवीकडे वळून घेवून बालाजी इंटरप्रायजेस लेन येथून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.